दैनिक गोमंतक वृत्तसेवा
गोवा म्हटलं म्हणजे साहजिकपणे आपल्यासमोर समुद्राचं चित्र उभं राहतं. पण गोव्यात येऊन कधी निळा समुद्र पाहिलाय का?
रात्री दिसणारा हा निळाशार समुद्र अनेक पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. मात्र निळा समुद्र म्हणजे काय?
डायनोफ्लेजेलेट नावाचा एक जीव एकप्रकरचा प्रकाश निर्माण करतो आणि पाण्याचं स्वरूप चमकणाऱ्या रूपात बदलतं.
हा जरी चमत्कार वाटत असला तरीही हा चमत्कार नसून यामागे रहस्य दडलेलं आहे.
डायनोफ्लेजेलेटमध्ये ल्युसिफेरिन नावाचे प्रकाश उत्सर्जित करणारे रंगद्रव्य आणि ल्युसिफेरेस नावाचे एन्झाइम असते.
जेव्हा हे दोन पदार्थ ऑक्सिजनच्या संपर्कात येतात तेव्हा रासायनिक प्रक्रिया होते, परिणामी प्रकाश उत्सर्जन होतो.
गोव्यात लोकं समुद्र किनारे पाहायला येतात आणि म्हणूनच जर का पर्यटक म्हणून तुम्ही देखील गोव्यात येत असाल तर ही माहिती तुम्हाला असली पाहिजे.
गोव्याला निसर्गाची देणगी आहे, त्यामुळे गोव्याला नक्की भेट द्या.