Akshay Nirmale
खासदार महुआ मोईत्रा या तृणमुल काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या आहेत. संसदेतील आक्रमक आणि अभ्यासू भाषणे, राहणीमान यामुळे त्या चर्चेत असतात. त्यांच्या भाषणांमुळे त्यांचा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.
12 ऑक्टोबर 1974 रोजी आसामच्या काचर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण कोलकाता आणि मॅसॅच्युसेट्स येथून शिक्षण घेतले. अर्थशास्त्र आणि गणित या विषयात त्यांनी पदवी घेतली आहे.
जेपी मॉर्गन चेस या कंपनीसाठी महुआ यांनी इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून न्यूयॉर्क आणि लंडन येथे त्यांनी काम केले.
महुआ आधी काँग्रेसमध्ये होत्या. त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2016 मध्ये त्या बंगालमधील करिमपूरच्या आमदार बनल्या आणि 2019 मध्ये कृष्णानगर येथून खासदार म्हणून निवडून आल्या.
महुआ यांच्या भाषणांप्रमाणेच त्यांच्या लाईफस्टाईलचीही नेहमी चर्चा होते. त्या पर्स, स्कार्फ, सँडल कुठल्या ब्रँड्सचे वापरतात याकडे अनेकांचे लक्ष असते.
त्या विविध ब्रँड्सच्या वस्तू वापरतात. त्यांच्याकडे Salvatore Farragamo ब्रँडचे सँडल्स आहेत. त्यांची किंमत 7 हजारापासून सुरू होऊन 70 हजार रूपयांपर्यंत असते.
महुआ Louis Vuitton या ब्रँडच्या पर्स वापरतात. त्याची किंमत हजारापासून लाखो रूपयांपर्यंत आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे Porchette ब्रँड्सच्याही बॅग्ज आहेत. त्यांच्याकडे Louis Vuitton याच ब्रँडचे स्कार्फ आहेत.