Sameer Amunekar
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स मुबलक प्रमाणात असतात, जे मेंदूच्या पेशींच्या कार्यक्षमतेस मदत करतात आणि स्मरणशक्ती वाढवतात.
या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक असतात, जे मेंदूच्या वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करून लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवतात.
थोड्या प्रमाणात डार्क चॉकलेट घेतल्याने मेंदूला ऊर्जा मिळते आणि रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे मेंदू अधिक सक्रिय राहतो.
सॅल्मन, टूना, सार्डिन यांसारख्या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स असतात, जे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि विचारशक्ती वाढवतात.
हळदीतील कर्क्युमिन मेंदूतील दाह कमी करून डिप्रेशन व तणाव कमी करण्यात मदत करते आणि न्यूरॉन्सना संरक्षण देते.
बियांमध्ये मॅग्नेशियम, झिंक, आयर्न आणि कॉपर असतात, जे मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक घटक आहेत.
पालक, मेथी, कोथिंबीर यांसारख्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन K, ल्युटीन आणि फोलेट असतात, जे मेंदू तल्लख ठेवण्यास मदत करतात.