Sameer Amunekar
आंघोळीनंतर चेहऱ्यावर गुलाबपाण्याचे हलके फवारे मारा. हे त्वचेला हायड्रेट ठेवते, ताजेतवानेपणा देते आणि त्वचेला नैसर्गिक ग्लो परत मिळवून देते.
शुद्ध कोरफड जेल चेहऱ्यावर हलक्या हातांनी मसाज करा. हे त्वचेला ओलावा देते, कोरडेपणा कमी करते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तजेला आणते.
थोडेसे बदाम तेल हातावर घेऊन चेहऱ्यावर हळुवार मसाज करा. यात असलेले व्हिटॅमिन ई त्वचेला पोषण देते आणि थंडीमुळे येणारी रेषा व कोरडेपणा कमी करतो.
मध नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. आंघोळीनंतर थोडासा मध चेहऱ्यावर ५ मिनिटं लावून कोमट पाण्याने धुवा. त्वचा मऊ आणि उजळ दिसते.
हिवाळ्यात थोडं नारळ तेल लावल्याने चेहऱ्याचा ओलावा टिकतो. हे त्वचेला कोरडेपणापासून वाचवते आणि नैसर्गिक ग्लो राखते.
एका बाटलीत ग्लिसरीन आणि गुलाबपाणी समप्रमाणात मिसळा. आंघोळीनंतर चेहऱ्यावर हलक्या हातांनी लावा. हे हिवाळ्यातील सर्वोत्तम नैसर्गिक सीरम ठरते.
थोडं कच्चं दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मऊ व उजळ होते. यात असलेले लॅक्टिक अॅसिड डेड स्किन काढून टाकते आणि त्वचेला नैसर्गिक चमक देते.