Sameer Panditrao
सोमवारी मूड फ्रेश ठेवण्यासाठी जाणून घ्या या ७ सोप्या टिप्स!
हा ‘सोमवार सिंड्रोम’ जवळजवळ प्रत्येकाला होतो. पण थोडेसे बदल केले, तर सोमवारसुद्धा छान वाटू शकतो!
रविवारी रात्री उशिरापर्यंत मोबाईल, सिरीज किंवा स्क्रोलिंग टाळा. कपडे, बॅग, टु-डू लिस्ट आधीच तयार ठेवा – सकाळचा ताण कमी होईल.
आवडतं गाणं लावा, हलकं व्यायाम करा किंवा कॉफीची सुगंधी चव घ्या. सकाळ आनंदी झाली, की ऑफिसला जाणं सोपं वाटतं!
सोमवारी कामांचं ओझं वाढलेलं असतं.महत्त्वाच्या कामांना आधी प्राधान्य द्या आणि छोट्या ब्रेकमध्ये स्वतःला रिवॉर्ड करा.
ऑफिसमधील मित्रांशी हलकीशी गप्पा, थोडं हसणं – मूड लगेच हलका होतो!
टीम एनर्जी वाढवण्यासाठी छोट्या गोष्टीही महत्त्वाच्या असतात.
सोमवारानंतरच्या संध्याकाळीसाठी छोटा ट्रीट प्लॅन करा — जसे आवडतं जेवण, वॉक, किंवा चित्रपट!