गोमन्तक डिजिटल टीम
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा इतिहास हा भारतीय आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील एक महत्त्वाचा अध्याय आहे
या मालिकेला अधिकृतपणे "बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी" असे नाव देण्यात आले, जे भारताचे सुनील गावसकर आणि ऑस्ट्रेलियाचे ऍलन बॉर्डर या महान खेळाडूंच्या नावावरून घेतले आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑक्टोबर १९९६ मध्ये पहिल्यांदा खेळली गेली.
त्यावर्षी फक्त एकच कसोटी सामना खेळला गेला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. हा सामना त्यांनी ७ विकेट्सनी गमावला होता.
२६ वर्षात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी १५ वेळा आयोजित करण्यात आली आहे. ज्यामध्ये भारताने ९ वेळा ही मालिका जिंकली आहे तर ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ पाचदा ही ट्रॉफी जिंकू शकला आहे. तर एकदा ही ट्रॉफीही अनिर्णित राहिली आहे.
विशेष बाब म्हणजे या काळात ऑस्ट्रेलियन संघाला भारतात फक्त एकदाच ट्रॉफी जिंकता आली आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नोव्हेंबर १९४७ ते जानेवारी १९९२ दरम्यान म्हणजेच ४५ वर्षांमध्ये १२ कसोटी मालिका खेळल्या गेल्या होत्या.