Manish Jadhav
गोव्यात सध्या शिगमोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. मोठ्या जल्लोषात शिगमोत्सव साजरा केला जात आहे. शिगमोत्सवाला गोव्यात विविध कार्यक्रमांचे नियोजन केले जाते.
शिगमोत्सवात रात्रभर पारंपरिक नृत्य, गाणी, ढोल-ताशांचे वादन आणि गावागावांतून मिरवणुका काढण्याची परंपरा आहे. गोव्यातील ग्रामीण भागात आजही या उत्सवाला विशेष महत्त्व आहे.
पूर्वी शिगमोत्सव गावापुरता मर्यादित होता, परंतु आता तो शहरी भागातही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गोमंतकीय आणि पर्यटक मिळून या उत्सवात आनंदाने सहभागी होतात.
शिगमोत्सवात गावोगावी कमिट्या स्थापन करुन कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. चला तर मग कोणते कार्यक्रम आयोजित केले जातात याबाबत जाणून घेऊया...
ढोलताशांच्या गजरांत, आकर्षक पेहराव, रंगीबेरंगी फेटे घालून, हातात तरंग, पताका, अब्दागिरी घेऊन, लोक तालबद्ध नाचत-गात येतात. त्यांच्याबरोबर लोकवाद्यांचे पथकही असते.
विविध पौराणिक प्रसंगांवर आधारित भव्य चित्ररथ तयार केले जातात. बारीकबारीक तपशिलांवर काटेकोर लक्ष देऊन आपला चित्ररथ सर्वांत उत्तम कसा होईल याकडे कलाकारांचे लक्ष असते.
यांत गोफनृत्य, धनगर नृत्य, कोळीनृत्य अशी अनेक पथके असतात.
चित्रकला, मुखवटा रंगवणे, मेहंदी, रांगोळी, वेशभूषा, वक्तृत्व आणि पाककला अशा विविध स्पर्धांचे नियोजन केले जाते.