गोमन्तक डिजिटल टीम
दिवाडी बेटावर प्रसिद्ध बोंदेरा उत्सव गावातील दोन प्रभागांत दोन वेगवेगळ्या शनिवारी साजरे केले जातात.
पहिल्या शनिवारी सां माथियस या प्रभागात हा उत्सव साजरा होतो तर पुढील शनिवारी तो पिएदाद या प्रभागात साजरा होतो.
सां माथियास प्रभागात बोंदेरा उत्सव अधिक पारंपारिक पद्धतीने तर पिएदाद प्रभागात साजरा होणाऱ्या महोत्सवाला आधुनिक ग्लॅमरचा स्पर्श झालेला दिसतो.
सर्वप्रथम सकाळी गावचे रहिवासी,फेस्ताकार यांनी संयोजित केलेल्या पातोळ्यांच्या फेस्ताने या महोत्सवाची सुरुवात होते.
कार्यक्रमात कार्यशाळा, व्याख्याने यांचा अंतर्भाव आहे. आपल्या परंपरांची माहिती देणारा हा कार्यक्रम म्हणजे एक शैक्षणिक अनुभव आहे.
दुपारी पारंपारिक जेवण आणि नंतर गावच्या पासयला (पदयात्रेला) सुरुवात होते. यात गावाचे दर्शन आणि ग्रामस्थांच्या सांस्कृतिक कलागुणांचे, पाककलेचे प्रदर्शन होते.
वॉन, पुडे (फोले), आलेबेले, लातोड, पातोळ्या, सान्ना, शिरा, गोडशे यांचाही आस्वाद आपल्याला पासयच्या दरम्यान घेता येतो.
फ्लोट-परेड बरोबर संध्याकाळ अधिक रंगीत बनेल. या फ्लोटमध्ये दिवाडी बेटाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तेथील गावकरी सादर करतात.
पृथ्वीच्या कॅनव्हासवर श्रावणातील रंगांची उधळण म्हणजे 'गोव्याचा निसर्ग'