Pramod Yadav
जुन्या काळातील हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते रणजीत, गुलशन ग्रोव्हर, रजा मुराद, करण कुमार यांनी हजेरी लावली.
सोमवारी, 27 नोव्हेंबर रोजी कला अकादमीत झालेल्या इन कॉन्व्हर्सेशन सत्रात सर्वांनी आपली मते मांडली.
रणजीत यांनी यावेळी चित्रपट, बेव सिरीजबाबत त्यांची मते मांडली.
यावेळी गुलशन ग्रोव्हर देखील उपस्थित होते, गुलशन यांनी जुन्या काळातील चित्रपटांच्या आठवणींना उजाळा दिला.
गुलशन यांनी देखील बदलत जाणाऱ्या सिनेमाची आणि अभिनयाची भाषा याबाबत भाष्य केले.
सर्वांनी चर्चा सत्रात हजेरी लावण्यापूर्वी रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली.
यावेळी त्यांनी प्रसाद माध्यमांशी देखील संवाद साधला.
रजा मुराद देखील यावेळी उपस्थित होते.
भारदस्त आवाज आणि सहज अभिनय अशी ओळख मुराद यांनी यावेळी सिनेमावर त्यांच्या शैलीत भाष्य केले.