Sameer Amunekar
चेक बाऊन्सप्रकरणी न्यायालयानं बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
राम गोपाल वर्मा यांचा 'सिंडिकेट' या नव्या चित्रपटाची घोषणा होण्याच्या एक दिवस आधी ही कारवाई करण्यात आलीय.
गेल्या सात वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. अखेर राम गोपाल वर्माला दोषी ठरवण्यात आलं आहे. मुंबईच्या अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
सात वर्षे जुन्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान राम गोपाल वर्मा न्यायालयात उपस्थित नव्हते. न्यायालयाने त्यांना कलम १३८ अंतर्गत दोषी ठरवलं. तसंच या प्रकरणातील तक्रारदाराला भरपाई म्हणून ३.७२ लाख रुपये देण्याचे आदेश दिलेत.
या प्रकरणात राम गोपाल वर्मा यांना न्यायालयानं जून २०२२ मध्ये ५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.
राम गोपाल वर्मा हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक आहेत. त्यांची ओळख प्रामुख्यानं क्राईम, थ्रिलर, हॉरर आणि राजकीय ड्रामा चित्रपटांसाठी आहे. त्यांचं हिंदी आणि तेलुगू सिनेमांमध्ये मोठं योगदान आहे.