गोमन्तक डिजिटल टीम
बॉलीवूड अभिनेता सलमान खान आज (२७ डिसेंबर) त्याचा ५९ वा वाढदिवस साजरा करत आहे.
बॉलीवूडमधील एक यशस्वी अभिनेता म्हणून सलामानची ओळख आहे. त्याच्या नावावर अनेक हीट सिनेमे आहेत.
बॉलीवूडमध्ये १०० करोड क्लब सुरु करणारा देखील सलमानच आहे. त्याच्या वॉन्टेड सिनेमाने १०० कोटींचा गल्ला कमवला होता.
सलमान जेवढा प्रसिद्ध अभिनेता आहे तेवढाच वादग्रस्त म्हणून देखील ओळखला जातो.
काळवीट हत्या प्रकरण असो की फूटपाथ वरील नागरिकांच्या अपघाती मृत्यूची घटना असो सलमान या प्रकरणामुळे अडचणीत सापडला होता.
सलमान खान काही वर्षांपूर्वी गोव्यात आला असता तो विमानतळावर तो फॅन्सवर संतापलेला दिसला.
विमानतळावरुन बाहेर पडताना सेल्फी काढणाऱ्या फॅनचा सलमान खानने मोबाईल हिसकावल्याची घटना घडली होती.
सलमानच्या या वर्तवणुकीवर त्याच्या चाहत्यांनी सडकून टीका केली होती. तसेच, तो चुकल्याचे चाहत्यांनी म्हटले होते.