Sameer Amunekar
'सन ऑफ सरदार', 'आर. राजकुमार', 'जय हो' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता मुकुल देवचं शनिवारी (२४ मे) निधन झालं.
मुकुल देवच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, ते आजारी होते आणि दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती समोर आलीय.
मुकुल देवबाबत काही अशा गोष्टी देखील आहेत, ज्या त्याच्या चाहत्यांना देखील माहित नाहीय.
फार कमी लोकांना माहीत आहे की, मुकुल देव एकेकाळी पायलट होता.
मुकुल देवनं कमर्शियल पायलट म्हणून प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. मात्र, सुरुवातीपासूनच त्यांना अभिनय क्षेत्रात यायचं होतं.
अभिनयाची आवड असल्यामुळं मुकुलनं हिंदी चित्रपट, टीव्ही शो व संगीत अल्बममध्ये काम करून खूप प्रसिद्धी मिळवली.