Manish Jadhav
गोव्याचं लुभावणारं निसर्ग सौंदर्य पाहून पर्यटक आपसूकच म्हणतात 'गोव्याची बात निराळी...'
गोव्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपलं दुसरं घर बनवलं आहे. त्यामुळे गोवा हा 'चमकिला गोवा' बनलाय.
आज (29 नोव्हेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीबद्दल जाणून घेणारोत. चकित झालात ना.. गोव्यातील त्याचं चार मजली आलिशान पेंटहाऊस नक्की पाहिले पाहिजे.
इम्रान हाश्मीनं गोव्यात चार मजली लॅविश पेंटहाऊस खरेदी केले आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणारे हे पेंटहाऊस प्रत्येकाला आकर्षित करतं.
इम्रन व्यस्त कामातून वेळ मिळाला किंवा गोव्यात चित्रपटाचे शूटिंग असल्यानंतर इथे येतो. इम्रान सांगतो की, गोव्यातील हा आलिशान व्हिला त्याचं आवडतं ठिकाण आहे.
इम्रानचे आलिशान पेंटहाऊस पर्यटकांना मोहिनी घालतं. विशेष म्हणजे, हे पेंटहाऊस समुद्रकिनाऱ्याजळ असल्याने सुखाच्या तारा छे़डून जातं.