Akshata Chhatre
लग्नाच्या सीझनमध्ये वधूंना त्यांच्या चेहऱ्यासोबत शरीरावरही नैसर्गिक चमक हवी असते.
पण पार्लरमधील बॉडी पॉलिशिंग महागडे असते.
यावर उपाय म्हणून, तुम्ही पुढील २ महिन्यांत लग्न असलेल्या वधूंसाठी घरगुती आणि प्रभावी बॉडी पॉलिशिंग पेस्ट तयार करू शकता.
यासाठी मसूर डाळीची पावडर, संत्र्याच्या सालीची पावडर, दही आणि हळद या चार गोष्टींची आवश्यकता आहे.
या सर्व गोष्टी एकत्र मिसळून एक पेस्ट तयार करा.
ही पेस्ट शरीरावर लावून हलक्या हातांनी घासल्यास टॅनिंग, डाग आणि मृत त्वचेच्या पेशी दूर होतात.
हा नैसर्गिक उपाय त्वचेला खोलवर पोषण देतो, ज्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो आणि ती लग्नाच्या दिवशी चमकदार, मऊ आणि निरोगी दिसते.