गोमन्तक डिजिटल टीम
दिवाळी सणाच्या शेवटी त्रिपुरारी पौर्णिमा येते. पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णाने त्रिपुर राक्षसाचा यादिवशी वध केला होता.
यादिवशी सर्वत्र दीपोत्सव उत्साहाने साजरा केला जातो.
गोव्यात साखळीतील वाळवंटी नदीत दिवे सोडून दीपोत्सव साजरा केला जातो.
गेल्या काही वर्षात नौका सजवून नदीत विहार करण्याची पद्धत प्रसिद्धीस आली आहे.
त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे नौकाविहार स्पर्धा.
राज्य सरकारचे पर्यटन, कला आणि संस्कृती खाते तसेच विठ्ठलापूर दीपावली समिती आणि श्री पांडुरंग देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव साजरा होतो.
त्रिपुरासुर वध, भगवान श्रीकृष्णाची मिरवणूक असे इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात.