Akshata Chhatre
मुलांना सांगा की तुम्ही त्यांच्यासोबत आहात. त्यांच्या छोट्या यशाचेही कौतुक करा. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते मनमोकळेपणाने चर्चा करतील.
अभ्यासादरम्यान फोन दूर ठेवण्याची सवय लावा. १ तास अभ्यासानंतर फक्त १०-१५ मिनिटांचा ब्रेक द्या आणि त्यात मुलांकडे लक्ष ठेवा.
मुलांसोबत बसून वेळापत्रक तयार करा. दिवसाची सुरुवात सर्वात कठीण विषयाने करा, कारण त्यावेळी मेंदूची ऊर्जा सर्वाधिक असते.
अभ्यासाच्या दबावात मुलांच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नका. आहारात सुका मेवा, फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा. पाणी भरपूर प्यायला द्या.
एकाग्रतेसाठी ७-८ तासांची झोप अनिवार्य आहे. उशिरापर्यंत जागण्याऐवजी सकाळी लवकर उठून अभ्यास करणे कधीही चांगले. पाॅवर नॅपही फायदेशीर ठरते.
मुलांच्या तयारीवर लक्ष ठेवा, पण त्यांना पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून ठेवू नका. त्यांना स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्यास प्रोत्साहित करा.