Sameer Amunekar
शिरोडा बीचची सर्वात मोठी ओळख म्हणजे येथील मखमली पांढरी वाळू. इतर ठिकाणच्या तुलनेत हा किनारा अत्यंत स्वच्छ असून उन्हाळ्याच्या उन्हातही इथली वाळू डोळ्यांना सुखद वाटते.
येथील पाणी इतके स्वच्छ आणि निळे आहे की तुम्हाला परदेशातील एखाद्या बीचवर असल्याचा भास होईल. प्रदूषणापासून दूर असल्याने समुद्रस्नानासाठी हे पाणी अतिशय सुरक्षित मानले जाते.
शिरोडा बीचचा उतार खूपच कमी आहे. त्यामुळे लहान मुले आणि कुटुंबातील सदस्यांना मनसोक्त पोहण्यासाठी आणि लाटांचा आनंद घेण्यासाठी हे सुरक्षित ठिकाण आहे.
या बीचचा संबंध थेट मिठाच्या सत्याग्रहाशी आहे. महात्मा गांधींनी पुकारलेल्या सत्याग्रहाच्या वेळी कोकणात शिरोडा येथेही मिठाचा सत्याग्रह झाला होता, त्यामुळे पर्यटनासोबतच याला ऐतिहासिक वारसाही लाभला आहे.
शिरोडा बीचच्या अगदी जवळ प्रसिद्ध 'आरवलीचा वेतोबा' मंदिर आहे. तसेच, इथून रेड्डी गणपती आणि यशवंतगड किल्ला देखील जवळ असल्याने एकाच ट्रिपमध्ये अनेक ठिकाणे पाहता येतात.
मालवण किंवा गोवा यांसारख्या प्रसिद्ध ठिकाणांच्या तुलनेत शिरोडा बीचवर गर्दी खूप कमी असते. जर तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीत गोंधळापासून दूर, शांततेत वेळ घालवायचा असेल, तर शिरोडा हा बेस्ट पर्याय आहे.
शिरोडा परिसरात अनेक घरगुती 'होमस्टे' उपलब्ध आहेत. येथे तुम्हाला अस्सल मालवणी पद्धतीचे जेवण, ताजी मासळी आणि सोलकढीचा आस्वाद घेता येतो, जो उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतो.