Sameer Amunekar
ब्लड कॅन्सर हा गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास तो अधिक धोकादायक ठरू शकतो. म्हणूनच, या लक्षणांची वेळेत दखल घेणे आवश्यक आहे.
नाक, हिरड्या किंवा इतर ठिकाणी सहज रक्तस्राव होणं हे ब्लड कॅन्सरचं लक्षण आहे. वारंवार रक्तस्राव होत असेल आणि त्यासोबत इतर लक्षणे जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अचानक वजन कमी होणे हे ब्लड कॅन्सरचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. शरीरात सतत अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो, ज्यामुळे भूक कमी होते.
कॅन्सरमुळे लाल रक्तपेशींचे प्रमाण कमी होते, त्यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही आणि थकवा जाणवतो.
ब्लड कॅन्सरमुळे पांढऱ्या रक्तपेशी (WBC) कमकुवत होतात, त्यामुळे शरीर लहान-सहान संसर्गांना बळी पडते आणि वारंवार ताप येतो.
प्लेटलेट्स हे रक्त गाठण्यास (Clotting) मदत करतात. ब्लड कॅन्सरमध्ये त्यांची संख्या कमी झाल्यास शरीरात सहज रक्तस्त्राव होतो आणि त्वचेवर निळसर किंवा जांभळट डाग पडतात.