Manish Jadhav
निरोगी आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा नियमित समावेश केला पाहिजे.
योग्य व्यायाम आणि नियमित आहार घेतल्याने कोणत्याही प्रकारच्या संसर्गाची लागण होत नाही.
भाज्यांचे नियमित सेवन केल्याने शरीराला योग्य पोषण मिळण्यास मदत होते. परंतु अनेकांना कारल्याची भाजी खायला आवडत नाही.
कारले चवीला कडू आहे यात शंका नाही, पण त्याचे नियमित सेवन केल्याने रक्त शुद्ध होतेच, शिवाय त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत.
कारल्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. कारल्याचे नियमित सेवन केल्याने शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहाते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
कारल्यासोबत चुकूनही गोड फळ खाऊ नये. कारले खाल्ल्यानंतर आंबा, केळी, चिकू इत्यादी गोड फळं खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी, आयरन, झिंक, पोटॅशियम, फायबर इत्यादी पोषक तत्वे असतात. कारल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरीसारखे गुणधर्म असतात.