HBD Naseem Shah: वेगवान गोलंदाजांची परंपरा पुढे नेणारा स्टार

Ashutosh Masgaunde

हॅप्पी बर्थडे

पाकिस्तानचा युवा गोलंदाज नसीम शाह याचा आज वाढदिवस आहे. 15 फेब्रुवारी 2003 मध्ये जन्मलेला नसीम आज 21 वर्षांचा झाला आहे.

Naseem Shah Birthday | X/Naseem Shah

कसोटीत हॅट्ट्रिक घेणारा सर्वात तरुण गोलंदाज

फेब्रुवारी 2020 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात, नसीम शाह 16 वर्षे आणि 359 दिवसांच्या वयात कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला.

Naseem Shah Birthday | X/Naseem Shah

पाकिस्तानकडून सर्वात वेगवान चेंडू

2019-20 कायदे-ए-आझम ट्रॉफीमध्ये, नसीम शाहने 156.2 किमी/ताशी वेगाने चेंडू फेकला होता. ज्यामुळे तो पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज बनला.

Naseem Shah Birthday | X/Naseem Shah

पाच बळी घेणारा तरुण गोलंदाज

2019 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यात नसीम शाहने वयाच्या 16 वर्षे 307 दिवसांत पाच बळी मिळवण्याची कामगिरी केली.

Naseem Shah Birthday | X/Naseem Shah

पोलीस अधिकारी

नसीम शाहला वयाच्या 19 व्या वर्षी बलुचिस्तान पोलिसांचे डीएसपी बनवण्यात आले आहे. क्रिकेटमधील कामगिरीसाछी त्याला मानद पदवी देण्यात आली आहे.

Naseem Shah Birthday | X/Naseem Shah

आयुष्यात अनेक वादळे

नसीम शाहने आयुष्यात अनेक वैयक्तिक संकटांचा सामना केला आहे. तो फक्त 13 वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले.

Naseem Shah Birthday | X/Naseem Shah

अनेक भाषांचे ज्ञान

क्रिकेट कौशल्याव्यतिरिक्त, नसीम शाह हा बहुभाषिक आहे आणि अनेक भाषा अस्खलितपणे बोलू शकतो. तो उर्दू, पंजाबी, पश्तो आणि इंग्रजी अस्खलितपणे बोलू शकतो.

Naseem Shah Birthday | X/Naseem Shah

100th Test For Ben Stokes: विक्रम दिग्गज ऑलराउंडरचे

Ben Stokes | X/Naseem Shah
अधिक पाहाण्यासाठी...