100th Test For Ben Stokes: विक्रम दिग्गज ऑलराउंडरचे

Ashutosh Masgaunde

100वी कसोटी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना कर्णधार बेन स्टोक्सच्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना आहे.

Ben Stokes | Twitter

इंग्लंडचा 16वा खेळाडू

इंग्लंडकडून 100 कसोटी सामने खेळणारा स्टोक्स हा 16 वा खेळाडू ठरणार आहे. इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम जेम्स अँडरसनच्या नावावर आहे. त्याने 184 कसोटी सामने खेळले आहेत.

Ben Stokes | X/CountyChamp

एकाच षटकात सर्वाधिक धावा

कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्टोक्सच्या नावावर आहे. त्या एशेज कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या कॅमरून ग्रीनच्या एकाच षटकात 24 धावा केल्या होत्या. पुढे हा विक्रम हॅरी ब्रुकने मोडला

Ben Stokes | Twitter

चौथ्या डावात दमदार कामगिरी

कसोटी क्रिकेटमध्ये सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या खेळाडूने यापूर्वी चौथ्या डावात कधीच 150 धावांचा आकडा गाठला नव्हता. पण अशी कामगिरी करणारा स्टोक्स पहिला खेळाडू आहे.

Ben Stokes | Dainik Gomantak

फलंदाजी

आतपर्यंत खेळलेल्या 99 कसोटींमध्ये स्टोक्सने 6251 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 द्विशतक, 13 शतके आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे.

Ben Stokes | Twitter

गोलंदाजी

99 कसोटींमध्ये स्टोक्सने गोलंदाजीमध्येही उत्तम कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत 197 विकेट्स घेतल्या आहेत. यात 4 वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

Ben Stokes | PTI

आधुनिक युगातील सर्वात स्फोटक अष्टपैलू

बेन स्टोक्स आधुनिक युगातील सर्वात स्फोटक अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याची क्रिकेटच्या मैदानावरील ऊर्जा अत्यंत उत्कट आणि आक्रमक असते. त्यामुळे त्याला मैदानावर पाहणे पर्वणी असते.

Ben Stokes | PTI

खेळाचं मैदान अन् व्हॅलेंटाईन; भारतीय खेळाडूंची प्यारवाली लव्हस्टोरी!

Sports Couples | Valentine's Day | Dainik Gomantak
अधिक पाहाण्यासाठी...