Gautam Adani: जेव्हा अदानींचं अपहरण झालं होतं... त्या रात्रीची कहाणी स्वत: सांगितली!

Manish Jadhav

देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी

देशातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या गौतम आदानी यांचा आज वाढदिवस आहे. ते अदानी समूहाचे सर्वेसर्वा आहेत. चला तर मग त्यांच्याविषयी आणखी जाणून घेऊया...

Gautam Adani | Dainik Gomantak

अदानी 62 वर्षांचे झाले!

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी 62 वर्षांचे झाले आहेत. 24 जून 1962 रोजी गुजरातमध्ये गौतम अदानी यांचा जन्म झाला.

Gautam Adani | Dainik Gomantak

व्यवसायाचा वारसा नव्हता

अदानी यांना व्यवसायाचा वारसा मिळाला नाही. त्यांनी आपल्या क्षमतेच्या जोरावर एवढे मोठे साम्राज्य उभे केले.

Gautam Adani | Dainik Gomantak

आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती

सध्या अदानी हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का गौतम अदानी यांचेही एकदा अपहरण झाले आहे. होय, त्यांनी स्वतः याबद्दल सांगितले आहे.

Gautam Adani | Dainik Gomantak

'वाईट काळ विसरलेला बरे...'

अदानी म्हणाले की, ‘जे कोणाच्या हातात नाही त्याची फार काळजी करण्याची गरज नाही.’ अदानी अनेक प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर आले आहेत.

Gautam Adani | Dainik Gomantak

आयुष्यात दोनदा मृत्यू जवळून पाहिला

अदानी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत त्यांच्या अपहरणाविषयी सांगितले. अदानी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आयुष्यात दोनदा मृत्यू खूप जवळून पाहिला.

Gautam Adani | Dainik Gomantak

‘त्या रात्रीही शांत झोपलो होतो’

अपहरणाबद्दल बोलताना अदानी म्हणाले की, 'वाईट काळ विसरणे चांगले असते. मी प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेतो. माझे अपहरण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझी सुटका झाली. पण ज्या रात्री माझे अपहरण झाले त्या रात्रीही मी शांत झोपलो होतो.’

Gautam Adani | Dainik Gomantak

1997 मध्ये अपहरण झाले होते

1997 मध्ये गौतम अदानी यांच्या अपहरणाच्या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती.

Gautam Adani | Dainik Gomantak