Manish Jadhav
गोव्यात दरवर्षी लाखो पर्यटक येतात. गोव्यातील निसर्ग सौंदर्य, निळाशार समुद्र किनारा, पशु-पक्षी, नारळी-पोपळीच्या बागा याचा पर्यटक पुरेपुर आनंद लुटतात.
पावसाळ्यात पर्यटक मोठ्याप्रमाणात गोव्यात येतात. गोव्यातील पाऊस काही औरचं आहे.
पर्यटक गोव्यातील तलाव नक्की पाहतात. कारंबोळ, मये आणि नेत्रावळी हे गोव्यातील प्रसिद्ध तलाव आहेत.
गोव्यातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर तलावांपैकी एक कांरबोळ तलाव आहे. या तलावाचे आणखी एक आकर्षण म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
हा तलाव गोव्यातील प्रसिद्ध तलावांपैकी एक आहे. निसर्ग प्रेमींसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. पर्यटक या तलावाला भेट देणे पसंद करतात. नौकाविहारासाठी हे प्रसिद्ध ठिकाण आहे. हा तलाव पक्ष्यांचे वस्तीस्थान आहे.
नेत्रावलीमध्ये बबलींग लेक म्हणून प्रसिद्ध असणार तलाव एक सुंदर नैसर्गिक चमत्कार आहे. 'बबलिंग' या शब्दाचा अर्थ कोंकणीमध्ये बुडबुडे आहे. मंत्रमुग्ध करणारे हे ठिकाण लहानांसाठी तसेच मोठ्यांसाठीसुद्धा मोहिनी घालते.
सलीम अली पक्षी अभयारण्य पक्षांसाठी संरक्षित अभयारण्य आहे. प्रख्यात भारतीय पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम मोइझुद्दीन अली यांच्या नावावरुन या अभयारण्याला नाव देण्यात आले. देशातील काही दुर्मिळ पक्ष्यांचे हे अभयारण्य आश्रयस्थान आहे.
कोटीगाव वन्यजीव अभयारण्य हे दक्षिण गोव्यात असून एक संरक्षित क्षेत्र आहे. घनदाट जंगले आणि वैविध्यपूर्ण वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे. गोव्यातील दुसरे सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य आहे.