Manish Jadhav
देशात लग्नसमारंभावर पाण्यासारखा पैसा खर्चा केला जातो.
आता लोक लग्नसमारंभापूर्वी वेडिंग प्लॅनर, डेस्टिनेशन वेडिंग, प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग फोटोशूट मोठ्या हौसेने करतात.
एका अहवालानुसार, भारतातील वेडिंग इंडस्ट्रीचा (Indian Wedding Industry) आकार सुमारे 10 लाख कोटी रुपयांचा आहे.
भारतात (India) लोक शिक्षणापेक्षा लग्नावर जास्त खर्च करतात. भारतीय विवाह समारंभावर शिक्षणापेक्षा दुप्पट खर्च होतो.
भारतात दरवर्षी 80 लाख ते 1 कोटी विवाह होतात. हे चीनसारख्या देशांपेक्षा जास्त आहे, जिथे दरवर्षी सुमारे 70-80 लाख विवाह होतात, तर अमेरिकेत हा आकडा 20-25 लाख आहे. याबाबतीत भारताने चीन आणि अमेरिकेला मागे टाकले.
विवाह सोहळ्यामुळे दागिने, पोशाख, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांना अप्रत्यक्षपणे फायदा होतो.
दरवर्षी 8 दशलक्ष ते 10 दशलक्ष विवाहसमारंभासह भारत हे जगातील सर्वात मोठे वेडिंग डेस्टिनेशन आहे, असे जेफरीज म्हणाले.
भारतीय विवाहसोहळे अनेक दिवस चालतात, यामध्ये प्रदेश, धर्म आणि आर्थिक पार्श्वभूमी महत्त्वाची भूमिका बजावते.