Bidar Fort History: मुघल, मराठा अन् बहामनींचा रक्तरंजित संघर्ष! औरंगजेबालाही झुंजवणारा दक्षिण भारतातील बुलंद शिलेदार 'बिदर'

Manish Jadhav

बहामनी साम्राज्याचे वैभव

बिदर किल्ला हा प्रामुख्याने बहामनी साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो. 1427 मध्ये सुलतान अहमद शाह वली याने गुलबर्गा येथून आपली राजधानी बिदरला हलवली आणि या भव्य किल्ल्याची पुनर्बांधणी केली.

Bidar Fort | Dainik Gomantak

किल्ल्याची अभेद्य तटबंदी

हा किल्ला त्याच्या 10 किलोमीटर लांब आणि अवाढव्य तटबंदीसाठी प्रसिद्ध आहे. या तटबंदीत 37 मोठे बुरुज आहेत. विशेष म्हणजे, शत्रूपासून संरक्षणासाठी किल्ल्याभोवती तिहेरी खंदक खोदले आहेत, जे भारतात दुर्मिळ मानले जातात.

Bidar Fort | Dainik Gomantak

वास्तुकलेचा अफाट नमुना

किल्ल्याच्या आत इंडो-इस्लामिक आणि पर्शियन वास्तुकलेचा सुंदर संगम पाहायला मिळतो. येथील 'रंगीन महाल' आपल्या रंगीत टाइल्स आणि लाकडी कोरीव कामासाठी जगप्रसिद्ध आहे.

Bidar Fort | Dainik Gomantak

मोहम्मद गावान मदरसा

बिदर किल्ल्याच्या परिसरात असलेली मोहम्मद गावान मदरसा ही तत्कालीन काळातील एक मोठी युनिव्हर्सिटी होती. 15व्या शतकातील या इमारतीची भव्यता आणि त्यावरील निळ्या रंगाचे नक्षीकाम आजही पर्यटकांना थक्क करते.

Bidar Fort | Dainik Gomantak

सोळा खंभा मशीद

किल्ल्यामध्ये 'सोळा खंभा मशीद' आहे, जी 16 मोठ्या खांबांवर उभी आहे. ही मशीद बहामनी काळातील स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना मानली जाते. याला 'झनानी मशीद' असेही म्हटले जाते.

Bidar Fort | Dainik Gomantak

'कारेंझ' पाणीपुरवठा यंत्रणा

बिदर किल्ल्याची पाणीपुरवठा यंत्रणा अत्यंत प्रगत होती. 'कारेंझ' या पर्शियन तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीखालून पाणी किल्ल्यात आणले जात असे, ज्यामुळे दुष्काळातही किल्ल्यावर पाण्याची कमतरता भासत नसे.

Bidar Fort | Dainik Gomantak

मराठा आणि मुघल सत्तांचा संघर्ष

बिदर किल्ल्यावर केवळ बहामनीच नव्हे, तर बरीद शाही, मुघल आणि मराठा साम्राज्याचाही प्रभाव राहिला आहे. औरंगजेबाने हा किल्ला जिंकण्यापूर्वी येथे अनेक भीषण युद्धे झाली होती, ज्याची साक्ष येथील अजस्त्र तोफा आजही देतात.

Bidar Fort | Dainik Gomantak

Belapur Fort: नवी मुंबईचा 'रॉयल' वारसा अन् चिमाजी अप्पांचा 'तो' ऐतिहासिक विजय... 500 वर्षांचा बेलापूर किल्ल्याचा धगधगता इतिहास

आणखी बघा