Sameer Amunekar
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात वसलेला भोगवे हा समुद्रकिनारा आजही पर्यटकांच्या गजबजाटापासून दूर आहे.
इथं तुम्हाला शांतता, निसर्गसौंदर्य आणि कोकणी संस्कृतीचं एक सुंदर मिश्रण अनुभवायला मिळतं. पावसाळ्यात तर भोगवेचं रूप अधिकच देखणं होतं.
भोगवे हे गाव आणि किनारा दोन्ही अजूनही पारंपरिक कोकणी जीवनशैली जपतात. इथले लोक पाहुणचारात मनापासून गुंतलेले असतात.
भोगवेच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरताना तुम्हाला कधी मासेमारी करणारी होड्यांची गर्दी दिसेल, तर कधी एखादं कोळी कुटुंब पावसात भिजत चाललेलं दिसेल.
भोगवेचा पावसाळी अनुभव हा केवळ नजरेचा नव्हे, तर आत्म्याला स्पर्श करणारा असतो.
जर तुम्हाला गर्दीपासून दूर, शांतता आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल, तर पावसाळ्यात भोगवे समुद्रकिनाऱ्याला भेट द्यायलाच हवी.