Sameer Panditrao
स्वातंत्र्यदिन असो, प्रजासत्ताक दिन असो, सोबत इतर शासकीय कार्यक्रम असोत, आपण राष्ट्रगीत गाऊन ध्वजाला वंदन करतो.
२४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेने हे जन गण मन राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले.
प्रथमतः जन गण मन बंगाली भाषेत लिहिले गेले होते.
ही रचना गुरु रवींद्रनाथ टागोर यांची आहे हे आपल्याला माहिती आहेच.
जन गण मन हे गीत पहिल्यांदा २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात गायले गेले होते.
कोलकाता जिल्ह्यातील बोबाजार स्ट्रीटवरील भारत सभेत हे अधिवेशन भरले होते.
संविधान सभेने हे गाणे हिंदी आवृत्तीत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले.