Sameer Panditrao
भगवान श्रीकृष्णाच्या हातात आपल्याला विविध शस्त्रे पाहायला मिळतात.
श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र हे शस्त्र आपल्याला माहिती आहेच.
याव्यतिरिक्त भगवान श्रीकृष्णच्या हातात तलवार, गदा ही शस्त्रे दिसतात.
क्वचित कधीतरी भगवान कृष्णासोबत धनुष्यबाण असल्याचे उल्लेख आढळतात.
भगवान श्रीकृष्णाच्या तलवारीचे नाव नंदक असे होते.
त्यांच्या धनुष्याचे नाव शारंग होते.
श्रीकृष्णाच्या गदेला कौमुदकी असे ओळखतात.