Manish Jadhav
भद्रा किल्ल्याची उभारणी इ.स. 141 मध्ये गुजरातचा सुलतान अहमद शाह पहिला याने केली. अहमदाबाद शहराची पायाभरणी करताना सर्वात आधी या भव्य किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले होते.
असे मानले जाते की, या किल्ल्याचे नाव मथुरेतील 'भद्र' नावाच्या एका प्राचीन वास्तुवरुन किंवा देवी भद्रकालीच्या नावावरुन पडले आहे. मराठा साम्राज्याच्या काळात इथे भद्रकाली मातेचे मंदिर स्थापन करण्यात आले.
इ.स. 1753 मध्ये पेशवे आणि गायकवाड यांनी मिळून मुघलांचा पराभव केला आणि भद्रा किल्ल्यावर मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज फडकावला. ब्रिटीश राजवट येईपर्यंत हा किल्ला मराठ्यांचे प्रमुख प्रशासकीय केंद्र होता.
44 एकर परिसरात पसरलेल्या या किल्ल्याचे बांधकाम लाल दगड आणि सुंदर कोरीव कामात केले आहे. किल्ल्याच्या पूर्वेला असलेला प्रसिद्ध 'तीन दरवाजा' हा महाद्वार आजही पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
राजवाड्याचे तुरुंगात रुपांतर!
किल्ल्याच्या आवारात मुघल काळात आझम खान यांनी एक भव्य 'सराई' (विश्रामगृह) बांधली होती. पुढे ब्रिटीश राजवटीत या ऐतिहासिक वास्तूचा वापर तुरुंग (Jail) म्हणून केला गेला.
मराठा शासकांनी किल्ल्याच्या आत बांधलेले भद्रकाली मातेचे मंदिर आजही अहमदाबादचे मुख्य श्रद्धास्थान आहे. अहमदाबाद शहराची 'नगरदेवी' म्हणून भद्रकाली मातेची पूजा केली जाते.
एका लोककथेनुसार, संपत्तीची देवी लक्ष्मी जेव्हा हा किल्ला सोडून जात होती, तेव्हा सिद्धी बशीर नावाच्या रक्षकाने शहराच्या कल्याणासाठी स्वतःचे बलिदान दिले. त्यामुळे लक्ष्मी देवी इथेच थांबली, अशी श्रद्धा आहे. तिथली एक ज्योत गेली 600 वर्षे अखंड जळत आहे.