Bhadra Fort: 3 मोठ्या राजवटींचा साक्षीदार! एकाच किल्ल्यावर मुघल, मराठे आणि ब्रिटिशांनी गाजवलं राज्य; 6 शतकांचा थरारक इतिहास

Manish Jadhav

भद्र किल्ला

अहमदाबाद शहराचा संस्थापक सुलतान अहमद शाह याने इ.स. 1411 मध्ये या भव्य किल्ल्याची निर्मिती केली. हा किल्ला शहराच्या अगदी मध्यभागात स्थित आहे.

Bhadra Fort | Dainik Gomantak

'भद्र' नावामागचे रहस्य

या किल्ल्याचे नाव 'भद्र' हे मराठा साम्राज्याच्या काळात पडले. किल्ल्यात असलेल्या भद्रकाली मातेच्या मंदिरावरुन याला 'भद्र किल्ला' म्हणून ओळखले जाऊ लागले.

Bhadra Fort | Dainik Gomantak

अप्रतिम स्थापत्यकलेचा नमुना

हा किल्ला इंडो-इस्लामिक आणि हिंदू स्थापत्यकलेचा एक अद्भुत संगम आहे. किल्ल्याचे कोरीव खांब, सुंदर कमानी आणि भव्य दरवाजे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.

Bhadra Fort | Dainik Gomantak

मराठा साम्राज्याचा इतिहास

पेशवे आणि गायकवाड यांच्या काळात या किल्ल्यावर मराठ्यांचे नियंत्रण होते. त्यांनी किल्ल्याच्या आत भद्रकाली मंदिराची स्थापना केली, जे आजच्या काळातही लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे.

Bhadra Fort | Dainik Gomantak

'तीन दरवाजा' मुख्य आकर्षण

किल्ल्याच्या पूर्वेला असलेला भव्य 'तीन दरवाजा' (Teen Darwaza) हा या परिसराचा मुख्य भाग आहे. हा दरवाजा किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून ऐतिहासिक काळात वापरला जात असे.

Bhadra Fort | Dainik Gomantak

मुलकी न्यायालय

मुघल काळात आझम खान याने किल्ल्याच्या आवारात एक भव्य 'सराई' (विश्रामगृह) बांधली होती. नंतरच्या काळात, म्हणजेच ब्रिटिश राजवटीत, याचा वापर तुरुंग आणि मुलकी न्यायालय म्हणून करण्यात आला.

Bhadra Fort | Dainik Gomantak

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन भारतीय पुरातत्व विभागाने याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. 2014 मध्ये या किल्ल्याचे मोठ्या प्रमाणावर पुनरुज्जीवन करण्यात आले.

Bhadra Fort | Dainik Gomantak

Raigad Fort: काळ थांबला, इतिहास नमला! जेव्हा सूर्य मावळला आणि रायगडचा कडा कडा रडला; छत्रपतींच्या शौर्याचा जिवंत दस्तऐवज

आणखी बघा