Sameer Panditrao
बेतुल बीच हा दक्षिण गोवा, येथे स्थित एक सुंदर आणि तुलनेने शांत समुद्रकिनारा आहे.
येथे साळ नदी आणि अरबी समुद्र यांचा संगम होतो.
साल नदी आणि अरबी समुद्राच्या संगमामुळे बेतूल आणि केळशी ही दोन गावे वेगळी होतात.
हा संगम फार नयनरम्य दिसतो.
बेतुल बीचवर येणाऱ्यांना समुद्रस्नानाबरोबरच नदीच्या पाण्याच्या संगमाचा अद्भुत अनुभव घेता येतो.
बेतुल हे पारंपरिक मासेमारी गाव म्हणूनही ओळखले जाते
बेतुल बीच हे दक्षिण गोव्यातील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या मडगावपासून अंदाजे 18 किलोमीटर अंतरावर आहे.