Sameer Panditrao
गुलमर्गमध्ये आशियातील सर्वोत्तम स्की स्लोप्स आहेत. गोंडोला राईड, स्कीइंग आणि स्नोबोर्डिंगसाठी हे भारतातील क्रमांक 1चे ठिकाण आहे.
औलीचे बर्फाच्छादित पठार स्कीइंग, स्नो ट्रेकिंग आणि केबल कारसाठी प्रसिद्ध आहे. जगातील सर्वोत्तम स्कीइंग स्पॉट्समध्ये याची गणना होते.
सोलंग व्हॅलीत स्कीइंग, पॅराग्लायडिंग, ट्यूबिंग, झॉर्बिंगसह अनेक हिवाळी खेळ खेळता येतात.
नथूला पास परिसरात स्नो ट्रेकिंग, हायकिंग, स्नो ट्यूबिंग आणि बर्फातील रस्त्यांवर ड्राईव्हचा अनोखा अनुभव घेता येतो.
तवांगमध्ये स्नो क्लाइंबिंग, स्नो वॉक, स्केटिंगसाठी नैसर्गिक बर्फाच्छादित वातावरण मिळते.
कुफरी हे शिमलाजवळचे छोटे पण लोकप्रिय ठिकाण आहे. स्की ट्रेनिंग, टॉबॅगनिंग आणि हिवाळी मेळावे यामुळे प्रसिद्ध होत आहे.
स्कीइंग, स्नो बाईक, स्लेडिंगसाठी पाटनीटॉप हा कमी गर्दीचा पण सुंदर हिवाळी पर्याय ठरत आहे.