Manish Jadhav
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटाजवळ असलेला हरिश्चंद्रगड हा ट्रेकर्स (Trekkers) आणि इतिहासप्रेमींसाठी एक अविस्मरणीय ठिकाण आहे.
हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील एक प्राचीन किल्ला असून, त्याची निर्मिती 6व्या शतकात काळचुरी राजवंशाच्या काळात झाली असावी, असे मानले जाते. या किल्ल्याचा उल्लेख 'मत्स्यपुराण', 'स्कंदपुराण' आणि 'अग्निपुराण' या प्राचीन ग्रंथांमध्येही आढळतो.
हरिश्चंद्रगडाचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे येथील कोकणकडा. हा अर्धवर्तुळाकार कडा सुमारे 1423 मीटर (4671 फूट) उंचीचा आहे आणि त्याची रचना एखाद्या भव्य नागाच्या फणेसारखी दिसते. या कड्यावरुन दिसणारे कोकण परिसराचे विहंगम दृश्य थक्क करते.
हरिश्चंद्रगडावर असलेले तारामती शिखर हे गडावरील तसेच संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे. ट्रेकर्समध्ये हे शिखर विशेष लोकप्रिय आहे.
गडावर असलेले भगवान शंकराचे प्राचीन हरिश्चंद्रेश्वर मंदिर हे गडाच्या स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरावर अनेक कोरीव कामे आढळतात, जी प्राचीन भारतीय शिल्पकलेची साक्ष देतात.
गडावर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित पाण्याची टाकी आहेत, ज्याचा वापर प्राचीन काळात लोक पाणी साठवण्यासाठी करत असत. 'सप्ततीर्थ पुष्करणी' हे त्यापैकी एक प्रमुख जलाशय आहे.
गडावर जाण्यासाठी प्रामुख्याने नळेशी मार्गे आणि खिरेश्वर मार्गे (सोपा मार्ग) हे दोन प्रमुख ट्रेकिंग मार्ग आहेत, ज्यामुळे नवशिक्यांपासून ते अनुभवी ट्रेकर्सपर्यंत सर्वांनाच हा ट्रेक करणे शक्य होते.
हरिश्चंद्रगड आणि त्याच्या सभोवतालचा परिसर हा घनदाट वनराईने वेढलेला आहे. येथे अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती, प्राणी आणि पक्षी आढळतात, ज्यामुळे हा भाग निसर्गाच्या अभ्यासासाठीही महत्त्वाचा ठरतो.
या गुंफेत एक मोठे शिवलिंग आहे, ज्याच्या चारही बाजूंनी पाणी असते. हे शिवलिंग चार खांबांवर उभे आहे. अशी आख्यायिका आहे की, यातील प्रत्येक खांब एका युगाचे प्रतीक आहे आणि जेव्हा एक युग संपते, तेव्हा एक खांब कोसळतो. आता यातील केवळ एकच खांब शाबूत आहे.