Manish Jadhav
निसान मोटरने त्यांच्या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॅग्नाइटसह एक मोठा टप्पा गाठला.
2020 मध्ये लाँच झाल्यापासून या सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्हीने भारत आणि परदेशात 2 लाख विक्रीचा टप्पा ओलांडला. निसानच्या या धमाकेदार कारने जागतिक आणि भारतीय बाजारपेठेत आपली छाप सोडली.
भारतातील 4 मीटरपेक्षा कमी लांबीच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये निसान मॅग्नाइट हा एक परवडणारा आणि स्टायलिश ऑप्शन आहे.
ही कार शानदार डिझाइन, प्रीमियम इंटीरियर आणि धमाकेदार फीचर्सह येते, जी बजेटमध्ये शक्तिशाली एसयूव्ही शोधणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करते.
निसान मॅग्नाइटची एक्स-शोरुम किंमत 6.14 लाखपासून सुरु होऊन 11.92 लाखांपर्यंत जाते. ही कार XE, XL, XV, XV प्रीमियम सारख्या अनेक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही ऑप्शन उपलब्ध आहेत.
मॅग्नाइटमध्ये दोन इंजिन ऑप्शन आहेत. 1.0-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन (72पीएस पॉवर) आणि 1.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन (100 पीएस पॉवर).