Sameer Amunekar
भारतात सूर्यास्त पाहण्यासाठी काही अप्रतिम ठिकाणं आहेत जिथे निसर्गाचं सौंदर्य आणि शांतता यांचा संगम अनुभवता येतो. या वेबस्टोरीमध्ये अशाच काही प्रसिद्ध ठिकाणांची यादी दिली आहे.
पांढर्या मिठाच्या रणात सूर्य मावळताना दिसणारा नजारा विलक्षण असतो. खास करून "रण उत्सव" दरम्यान येथे पर्यटकांची गर्दी असते.
भारतातील सगळ्यात लांब समुद्रकिनारा मरीना बीच आहे. इथे सूर्यास्ताचं शांत सौंदर्य अनुभवता येतं.
पिचोला तलावाजवळ सूर्य मावळताना संपूर्ण शहर सोनसळी रंगात न्हालेलं दिसतं. खास करून "सज्जनगड पॅलेस" परिसरातून हा नजारा फारच सुंदर दिसतो.
अरबी समुद्रात मावळणारा सूर्य आणि डोंगरकड्यांवरील पार्श्वभूमी यामुळे फोटोसाठी उत्तम स्पॉट. इथे सूर्यास्त बघताना बीचवर संगीत आणि मोकळा वारा अनुभवता येतो.
नारळाच्या झाडांतून दिसणारा सूर्य आणि शांत किनारा येथे अनुभवायला मिळतो. हे अतिशय रोमँटिक ठिकाण आहे.