Sunscreen Guide: तुमची त्वचा ऑईली की ड्राय? तुमच्या स्किन टाईपसाठी 'बेस्ट सनस्क्रीन' निवडण्याचे सोपे मार्ग

Sameer Amunekar

योग्य SPF ची निवड करा

भारतीय हवामानानुसार, किमान SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेले सनस्क्रीन निवडावे. जर तुम्ही जास्त वेळ उन्हात राहणार असाल, तर SPF 50 असलेले सनस्क्रीन वापरणे अधिक फायदेशीर ठरते.

Best sunscreen for oily skin | Dainik Gomantak

'ब्रॉड स्पेक्ट्रम' लेबल तपासा

सनस्क्रीन घेताना त्यावर 'Broad Spectrum' लिहिलेले आहे का ते पाहा. असे सनस्क्रीन सूर्याच्या UVA (वृद्धत्वासाठी कारणीभूत) आणि UVB (त्वचा भाजण्यासाठी कारणीभूत) या दोन्ही घातक किरणांपासून संरक्षण देते.

Best sunscreen for oily skin | Dainik Gomantak

त्वचेच्या प्रकारानुसार निवड

तेलकट त्वचा: मॅट फिनिश किंवा जेल-बेस्ड (Gel-based) सनस्क्रीन वापरा. कोरडी त्वचा: मॉइश्चरायझिंग किंवा क्रीम-बेस्ड सनस्क्रीन निवडा. सेन्सिटिव्ह त्वचा: झिंक ऑक्साइड किंवा टायटॅनियम डायऑक्साइड असलेले फिजिकल सनस्क्रीन वापरा.

Best sunscreen for oily skin | Dainik Gomantak

'टू फिंगर' रुल

सनस्क्रीन लावताना प्रमाण महत्त्वाचे असते. आपल्या हाताच्या मधल्या दोन बोटांवर येईल इतके सनस्क्रीन चेहरा आणि मानेसाठी पुरेसे असते. कमी प्रमाणात लावल्यास पूर्ण संरक्षण मिळत नाही.

Best sunscreen for oily skin | Dainik Gomantak

घराबाहेर पडण्यापूर्वी २० मिनिटे आधी लावा

सनस्क्रीन लावल्याबरोबर लगेच उन्हात जाऊ नका. ते त्वचेमध्ये नीट शोषले जाण्यासाठी आणि संरक्षक कवच तयार करण्यासाठी किमान १५ ते २० मिनिटांचा वेळ लागतो.

Best sunscreen for oily skin | Dainik Gomantak

दर २-३ तासांनी पुन्हा लावा

सनस्क्रीनचा प्रभाव ठराविक काळानंतर कमी होतो. विशेषतः जर तुम्हाला जास्त घाम येत असेल किंवा तुम्ही पोहत असाल, तर दर २ ते ३ तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावणे आवश्यक आहे.

Best sunscreen for oily skin | Dainik Gomantak

सर्व उघड्या भागांना लावा

अनेकजण फक्त चेहऱ्याला सनस्क्रीन लावतात. परंतु, मान, कान, हात आणि पाय जे भाग उन्हाच्या संपर्कात येतात, त्या सर्वांना सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे, जेणेकरून टॅनिंग आणि सनबर्न टाळता येईल.

Best sunscreen for oily skin | Dainik Gomantak

उन्हाळ्यातील वर्कआऊटसाठी 'हे' आहेत बेस्ट एनर्जी बूस्टर्स

Best Summer Drinks | Dainik Gomantak
येथे क्लिक करा