Sameer Amunekar
गोवा निसर्गसौंदर्य, सुंदर समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला गोव्यात सुंदर फोटो काढायचे असतील तर खाली दिलेल्या ठिकाणी परफेक्ट फोटो स्पॉट्स ठरू शकतात
बासिलीका ऑफ बॉम जीजस ही गोव्यातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक चर्चपैकी एक आहे. युनेस्कोने हे स्थळ जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. फोटोग्राफी लव्हर्ससाठी बेस्ट स्पॉट आहे.
दोना पावला व्ह्यू पॉईंट हे गोव्यातील सर्वात रोमँटिक आणि नयनरम्य ठिकाणांपैकी एक आहे. हे ठिकाण खासकरून त्याच्या सिनेमॅटिक लोकेशन आणि मनमोहक समुद्रदृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.
शापोरा किल्ला हा गोव्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आयकॉनिक ठिकाणांपैकी एक आहे. "दिल चाहता है" या बॉलिवूड चित्रपटामुळे हा किल्ला प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
बटरफ्लाय बीच हे गोव्यातील एक अप्रतिम, शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. तुलनेने कमी गर्दी असल्याने, या बीचवर तुम्हाला शांततेत आणि नैसर्गिक सौंदर्यात रमण्याची संधी मिळते.
केरी बीच हा गोव्याच्या सर्वात उत्तर टोकाला असलेला एक सुंदर आणि तुलनेने कमी गर्दी असलेला बीच आहे. हा बीच शांत, स्वच्छ आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे, त्यामुळे तुम्हाला प्रायव्हेट बीचचा अनुभव मिळू शकतो.