Sameer Amunekar
वसंत ऋतू हा फिरण्यासाठी उत्तम काळ असतो, कारण या काळात हवामान आल्हाददायक आणि निसर्ग फुललेल्या सौंदर्याने नटलेला असतो. भारतातील काही उत्तम पर्यटनस्थळे जी वसंत ऋतूमध्ये फिरण्यासाठी बेस्ट आहेत.
वसंत ऋतूमध्ये काश्मीरला भेट देणे हा एक अप्रतिम अनुभव असतो. या काळात निसर्ग आपल्या पूर्ण सौंदर्यात असतो. झाडांना नवीन पालवी फुटलेली असते, आणि पर्वतांवर अजूनही बर्फाचे आवरण असते.
केरळला वसंत ऋतूमध्ये भेट देणे म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात एक अद्भुत अनुभव घेणे. या काळात हवामान सुटसुटीत आणि आल्हाददायक असते. हिरवीगार वनराई, सुंदर चहाचे मळे, शांत समुद्रकिनारे आणि बॅकवॉटर सफरीमुळे केरळ एक परिपूर्ण पर्यटनस्थळ आहे.
वसंत ऋतू गोवा भेटीसाठी उत्तम काळ आहे. उन्हाळ्याच्या आधीचे सुटसुटीत हवामान, तुलनेने कमी गर्दी आणि उत्तम निसर्गसौंदर्य यामुळे या काळात गोवा अधिक आकर्षक वाटतो. तुम्हाला सुंदर समुद्रकिनारे, साहसी जलक्रीडा, नाईटलाईफचा आनंद घेता येतो.
मध्य प्रदेशमध्ये इतिहास, निसर्ग, वन्यजीव आणि सांस्कृतिक ठिकाणे यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. वसंत ऋतूमध्ये (मार्च ते मे) येथे हवामान आल्हाददायक असते, त्यामुळे पर्यटनासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो.
तमिळनाडूतील हिल स्टेशन म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक स्वर्ग. वसंत ऋतूमध्ये येथे हवामान आल्हाददायक असते आणि हिरवाई अधिक खुलते. तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी आराम करायचा विचार करत असाल, तर कूर्ग, ऊटी आणि कोडैकनाल ही तीन उत्तम ठिकाणे आहेत.