Sameer Amunekar
संत्रंमध्ये व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असते, जे लोह शोषणास मदत करतं. त्यामुळे लोहतत्वयुक्त आहारासोबत संत्र्याचा समावेश अॅनिमिया टाळण्यासाठी उपयोगी ठरतो.
अननस शरीरातील लोहतत्व शोषून घेण्याची क्षमता वाढवतो. त्यातील अॅन्टीऑक्सिडंट्स आणि अॅन्टी-इंफ्लेमेटरी गुणधर्म अॅनिमियावर उपयुक्त आहेत.
लोहतत्व, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असलेले डाळिंब रक्त वाढवण्यासाठी प्रभावी आहे. अॅनिमिया असलेल्या व्यक्तींनी रोज खाणं फायद्याचं ठरतं.
"दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरपासून दूर रहा" हे वाक्य अॅनिमियासाठी सुद्धा लागू पडतं. लोहतत्व आणि अॅण्टीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत.
केळंमध्ये फॉलिक अॅसिड असतं जे लाल रक्तपेशी निर्माण करण्यासाठी गरजेचं आहे. अॅनिमियासाठी हे फळ उपयुक्त ठरतं.
चीकूमध्ये लोहतत्व भरपूर असते. थकवा, अशक्तपणा दूर करण्यासाठी व हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे फळ लाभदायक आहे.
अंजीर म्हणजे लोह, फॉलिक अॅसिड आणि फायबरचा उत्तम स्रोत. कोरडे किंवा ताजे अंजीर खाल्ल्यास अॅनिमियाशी लढण्यास मदत होते.