Sameer Amunekar
ऑक्टोबरमध्ये राजस्थानला भेट देणे सर्वोत्तम मानले जाते. 'तलावांचे शहर' असलेल्या उदयपूरमध्ये या काळात कडक ऊन नसते. येथील ऐतिहासिक राजवाडे, लेक पिचोलामध्ये बोटिंग आणि राजस्थानी संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी हे बेस्ट ठिकाण आहे
पावसाळ्यानंतर 'गॉड्स ओन कंट्री' केरळचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. मुन्नारचे अथांग पसरलेले चहाचे मळे, धुक्याने वेढलेले डोंगर आणि आल्हाददायक हवामान निसर्गप्रेमींना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते.
'पूर्वेचे स्कॉटलंड' म्हणून ओळखले जाणारे शिलाँग ऑक्टोबरमध्ये खूपच विलोभनीय दिसते. पावसाळा नुकताच संपलेला असल्याने इथले धबधबे (जसे की नोहकलिकाई), स्वच्छ तलाव आणि हिरवेगार डोंगर पर्यटकांना भुरळ घालतात.
जर तुम्हाला ऐतिहासिक वास्तू आणि शांततेची आवड असेल, तर ऑक्टोबरमध्ये हंपीला नक्की भेट द्या. युनेस्को (UNESCO) जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या हंपीचे भव्य दगडी रथ आणि प्राचीन मंदिरे पाहण्यासाठी हे हवामान अतिशय अनुकूल असते.
ऑक्टोबरमध्ये हिमाचलमध्ये गुलाबी थंडीची सुरुवात होते. सफरचंदाच्या बागा, पाइनच्या जंगलांमधून जाणारे रस्ते आणि शांत निसर्ग अनुभवायचा असेल तर मनाली किंवा त्याजवळील 'जीभी' (Jibhi) या सुंदर गावाला नक्की भेट द्या.
पावसाळा पूर्णपणे संपल्यामुळे ऑक्टोबरमध्ये अंदमानचा समुद्र शांत आणि पाणी अतिशय स्वच्छ (Crystal Clear) असते. स्कूबा डायव्हिंगसारख्या वॉटर स्पोर्ट्सचा थरार आणि पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यांवर रिलॅक्स होण्यासाठी हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे.
'सातपुड्याची राणी' म्हणून प्रसिद्ध असलेले पचमढी हे मध्य प्रदेशातील अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. ऑक्टोबरच्या सुखद हवेत येथील रहस्यमयी गुहा, घनदाट जंगले आणि बी-फॉल (Bee Fall) सारखे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.