Sameer Amunekar
मे महिन्यात फिरायला खूप छान ठिकाणं आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे आणि हवामानामुळे लोक विशेषतः थंड व हवेशीर ठिकाणांचा शोध घेतात. या वेबस्टोरीमध्ये फिरण्यासाठी काही ठिकाणं दिली आहेत.
दार्जिलिंग, पश्चिम बंगालमधील एक अत्यंत सुंदर आणि रम्य ठिकाण आहे. इथली गोड चहा बागा, थंडगार हवामान आणि निसर्गरम्य सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करतं.
गोवा हे समुद्रकिनाऱ्याच्या प्रेमींना भुरळ घालणारं ठिकाण आहे. मे महिन्यात इथे गर्दी तुलनेने कमी असते, त्यामुळे बीचवर मोकळ्या मनाने शांतता अनुभवता येते.
स्पीती व्हॅली, हिमाचल प्रदेशमधील एक अनोखं आणि थक्क करणारं ठिकाण आहे, जे विशेषतः ट्रेकिंग आणि अॅडव्हेंचर प्रेमींसाठी स्वर्ग मानलं जातं.
मनाली, हिमाचल प्रदेशातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, जे आपल्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. मे महिन्यात जरी बर्फ वितळायला लागलेला असतो, तरीही इथलं हवामान अत्यंत आल्हाददायक आणि मन प्रसन्न करणारं राहतं.
महाबळेश्वर, महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन, थंड हवामान, हिरवीगार डोंगररांगा आणि निसर्ग सौंदर्यासाठी ओळखलं जातं.