Sameer Amunekar
केळीच्या सालीत पोटॅशियम, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे (Vitamins) भरपूर प्रमाणात असतात. जे त्वचा, केस, दात आणि इतर आरोग्य समस्यांसाठी फायदेशीर ठरतात.
सालीतील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन E & C त्वचेला नॅचरल ग्लो देतात. केळीच्या सालीचा आतील भाग चेहऱ्यावर चोळा आणि १५-२० मिनिटांनी धुवा.
केळीच्या सालीतील पोषकद्रव्ये त्वचेला हायड्रेट ठेवतात आणि काळी वर्तुळे कमी करतात. केळीच्या सालीचे छोटे तुकडे डोळ्यांखाली ठेवा. १०-१५ मिनिटांनी धुवा.
केस गळती कमी करून, केसांना नैसर्गिक चमक देतो. सालीचा पेस्ट करून त्यात नारळ तेल मिसळा आणि केसांना लावा. ३० मिनिटांनी केस धुवा.
सालीत फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पचन सुधारतात आणि चयापचय (Metabolism) वाढवतात. सालीचा रस काढून रोज प्यायला हरकत नाही.
सालीतील घटक वेदना आणि जळजळ कमी करतात. सालीचा आतील भाग कीडदंश, डास चावल्याच्या ठिकाणी चोळा.