Sameer Amunekar
स्वच्छ निळे पाणी आणि पांढरी वाळू! येथे तुम्ही 'अंडरवॉटर' फोटोग्राफी करू शकता. मावळत्या सूर्याचे फोटो काढण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
समुद्राच्या काठी वसलेले स्वयंभू गणपती मंदिर आणि अथांग पसरलेला समुद्रकिनारा. येथील नैसर्गिक प्रकाश फोटोग्राफीसाठी अतिशय उत्तम आहे.
समुद्राच्या मधोमध असलेला हा ऐतिहासिक किल्ला फोटोग्राफीसाठी एक उत्तम 'कॅनव्हास' आहे. किल्ल्याचे बुरूज, तटबंदी आणि पाठीमागील अथांग सागर यामुळे येथे कमालीचे फोटो येतात.
जिथे नदी आणि समुद्र एकमेकांना मिळतात, तो 'संगम' परिसर अतिशय मोहक आहे. येथील बोटींचे फोटो आणि निसर्गाचे विहंगम दृश्य नक्कीच कॅमेऱ्यात कैद करण्यासारखे आहे.
येथील कडेकपारी आणि लाटांचा खडकांवर होणारा आघात अतिशय थरारक दिसतो. निसर्गप्रेमी आणि लँडस्केप फोटोग्राफर्ससाठी हे नंदनवन आहे.
रत्नागिरी ते मालगुंड दरम्यानचा हा रस्ता म्हणजे फोटोग्राफीसाठी स्वप्नवत आहे. एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला डोंगररांगा! 'ड्रोन शॉट'साठी हे उत्तम ठिकाण आहे.
दापोलीतील समुद्रकिनारे शांत आणि गर्दीपासून दूर आहेत. येथील नारळी-पोफळीच्या बागा आणि शांत किनाऱ्यावर 'पोर्ट्रेट' फोटोग्राफी अप्रतिम येते.