Monsoon Travel India: निसर्गप्रेमींसाठी पर्वणी! पावसाळ्यात भारतातील 'या' 6 ठिकाणांचे सौंदर्य पाहून थक्क व्हाल

Sameer Amunekar

पावसाळ्यातील स्वप्नवत अनुभव

पाऊस सुरू झाला की निसर्ग पुन्हा एकदा बहरतो. हिरवेगार डोंगर, धबधबे आणि धुके अनुभवण्यासाठी भारतातील 'ही' 5 ठिकाणे सर्वोत्तम आहेत.

Monsoon Travel India | Dainik Gomantak

लोणावळा आणि खंडाळा (महाराष्ट्र)

सह्याद्रीच्या कुशीत वसलेली ही ठिकाणे पावसाळ्यात अक्षरशः ढगांच्या सावलीत लपतात. इथले धबधबे आणि हिरवेगार घाट पाहणे म्हणजे एक मेजवानीच असते.

Monsoon Travel India | Dainik Gomantak

मुन्नार (केरळ)

चहाच्या मळ्यांनी नटलेला मुन्नार पावसाळ्यात हिरवागार शालू पांघरल्यासारखा दिसतो. धुक्यात हरवलेले डोंगर आणि शांत वातावरण मनाला प्रसन्न करते.

Monsoon Travel India | Dainik Gomantak

चेरापुंजी (मेघालय)

जगातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक! इथले 'लिव्हिंग रूट ब्रिजेस' आणि कोसळणारे भव्य धबधबे पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.

Monsoon Travel India | Dainik Gomantak

कूर्ग (कर्नाटक)

'भारताचे स्कॉटलंड' म्हणून ओळखले जाणारे कूर्ग पावसाळ्यात अधिकच खुलते. कॉफीचे मळे आणि इथल्या दाट जंगलांमधील भटकंती निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच आहे.

Monsoon Travel India | Dainik Gomantak

उदयपुर (राजस्थान)

पावसाळ्यात उदयपूरचे रूप पूर्णपणे बदलते. सरोवरांचे शहर असलेल्या या ठिकाणचे सौंदर्य पावसाच्या सरींमध्ये अधिकच वाढते, जे पर्यटकांना भुरळ घालते.

Monsoon Travel India | Dainik Gomantak

निसर्गाच्या सानिध्यात फिरायला चला!

जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल, तर यंदाच्या पावसाळ्यात यापैकी एका ठिकाणाला नक्की भेट द्या. या ठिकाणांचे सौंदर्य पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल!

Monsoon Travel India | Dainik Gomantak

पिंपल्सची समस्या आता संपणार! अंघोळीपूर्वी चेहऱ्यावर लावा 'हे' खास मिश्रण

Beauty Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा