Sameer Amunekar
सतत येणाऱ्या पिंपल्समुळे त्रस्त आहात? तर मग महागड्या क्रिम्स सोडून नैसर्गिक उपायांकडे वळा आणि मिळवा डागमुक्त, नितळ त्वचा.
चेहऱ्यावरील मुरुमे आणि काळे डाग घालवण्यासाठी तुमच्या किचनमधील साहित्यच ठरेल रामबाण उपाय. हे मिश्रण तयार करणे अत्यंत सोपे आहे.
एका बाऊलमध्ये १ चमचा चंदन पावडर, अर्धा चमचा हळद आणि थोडे गुलाब पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. हे मिश्रण पिंपल्सवर जादू करते.
हे तयार मिश्रण अंघोळीच्या १५ ते २० मिनिटे आधी चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. यामुळे त्वचेतील अतिरिक्त तेल शोषले जाते.
नियमित वापरामुळे त्वचेची छिद्रे मोकळी होतात, रक्ताभिसरण सुधारते आणि नैसर्गिक चमक (ग्लो) वाढण्यास मदत होते.
हे मिश्रण लावताना लक्षात ठेवा की, हलक्या हाताने मसाज करा. खूप जोरात घासल्याने त्वचेवर जळजळ होऊ शकते.
पिंपल्समुक्त त्वचेसाठी आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा हा उपाय करा. सोबतच भरपूर पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या!