Sameer Amunekar
पावसाळ्यात लोणावळ्यातील हिरवीगार दऱ्या, धबधबे आणि थंडगार वातावरण पर्यटकांना अक्षरशः मोहून टाकते.
घनदाट जंगल, धुक्याने झाकलेले पॉइंट्स आणि शांत वातावरणामुळे पावसाळ्यात माथेरानची सफर अविस्मरणीय ठरते.
रंधा धबधबा, आर्थर लेक आणि आजूबाजूची हिरवळ पावसाळ्यात भंडारदराला स्वर्गासारखं सुंदर बनवते.
डोंगर, धबधबे आणि प्रसन्न हवामानामुळे ट्रेकिंग व निसर्गप्रेमींसाठी इगतपुरी हा उत्तम पर्याय आहे.
पावसाळ्यात कसारा घाटातील धुकं, वळणदार रस्ते आणि कोसळणारे धबधबे मनाला भुरळ घालतात.
निसर्गाच्या सान्निध्यात ट्रेकिंग, पक्षीनिरीक्षण आणि पावसाळी वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल तर कर्नाळा सर्वोत्तम ठिकाण आहे.
उंच डोंगर, असंख्य धबधबे, धुक्याची चादर आणि मनमोहक दृश्यांमुळे माळशेज घाट पावसाळ्यात प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावा असे ठिकाण आहे.