Sameer Amunekar
नारळ-सुपारीच्या बागा आणि पांढऱ्या शुभ्र वाळूचा अथांग समुद्रकिनारा हे गुहागरचे वैशिष्ट्य. इथे तुम्ही सहकुटुंब 'व्याडेश्वर' मंदिराचे दर्शन घेऊ शकता आणि घरगुती कोकणी जेवणाचा आस्वाद घेऊ शकता.
जर तुमच्या फॅमिलीला अॅडव्हेंचर आवडत असेल, तर तारकर्लीला नक्की जा. इथे तुम्ही स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. सोबतच ऐतिहासिक 'सिंधुदुर्ग' किल्ला पाहणे ही मुलांसाठी मोठी पर्वणी ठरेल.
धार्मिक आणि निसर्गरम्य अशा दोन्ही गोष्टींचा संगम इथे पाहायला मिळतो. श्री गणेशाचे दर्शन घेऊन समुद्राच्या लाटांवर मनसोक्त बागडण्यासाठी हे एक सुरक्षित आणि सुंदर ठिकाण आहे.
पुणे आणि मुंबईपासून जवळ असलेले हे गाव फॅमिली पिकनिकसाठी अतिशय लोकप्रिय आहे. येथील सोनेरी वाळूचा किनारा आणि प्रसन्न वातावरण मनाला उभारी देते.
याला 'दक्षिण काशी' म्हटले जाते. इथला समुद्रकिनारा आणि काळभैरव मंदिराची प्रदक्षिणा एक वेगळाच अनुभव देते. डोंगर आणि समुद्राच्या संगमावर वसलेले हे गाव सहलीसाठी उत्तम आहे.
दापोलीला 'कोकणचे महाबळेश्वर' म्हटले जाते. येथील थंड हवा, आंजर्लेचा समुद्रकिनारा आणि कड्यावरचा गणपती ही ठिकाणे फॅमिलीसोबत फिरण्यासाठी अतिशय सुखद आहेत.
जर तुम्हाला अगदीच शांतता हवी असेल, तर वेंगुर्ल्याला पसंती द्या. येथील सागरेश्वर किनारा आणि डच वास्तू पाहण्यासारख्या आहेत. येथील काजूच्या बागा आणि निसर्ग सौंदर्य मनाला भुरळ घालते.