Konkan Tourism: समुद्रकिनारा अन् नारळ-पोफळीच्या बागा, उन्हाळी ट्रिपसाठी कोकणातील 7 बेस्ट स्पॉट्स

Sameer Amunekar

मालवण आणि तारकर्ली (सिंधुदुर्ग)

उन्हाळ्यात समुद्राच्या निळ्याशार पाण्याचा आनंद घ्यायचा असेल, तर मालवणला पर्याय नाही. येथील तारकर्ली बीच आपल्या पांढऱ्या वाळूसाठी प्रसिद्ध आहे. तसेच सिंधुदुर्ग किल्ला पाहणे एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.

Best Konkan tourism spots summer | Dainik Gomantak

गणपतीपुळे (रत्नागिरी)

धार्मिक महत्त्व आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा संगम म्हणजे गणपतीपुळे. येथील स्वयंभू गणपतीचे मंदिर थेट समुद्रकिनाऱ्यावर आहे. उन्हाळ्याच्या संध्याकाळी येथील विस्तीर्ण किनाऱ्यावर फिरणे अतिशय सुखद असते.

Best Konkan tourism spots summer | Dainik Gomantak

दापोली (रत्नागिरी)

दापोलीला 'कोकणचे महाबळेश्वर' म्हटले जाते, कारण येथील हवामान इतर ठिकाणांच्या तुलनेत थोडे थंड असते. येथील मुरुड बीच, लाडघर बीच आणि कर्दे बीच पर्यटकांचे आवडते आहेत.

Best Konkan tourism spots summer | Dainik Gomantak

वेंगुर्ला आणि शिरोडा बीच (सिंधुदुर्ग)

जर तुम्हाला शांतता हवी असेल, तर वेंगुर्ल्याचा पर्याय निवडा. येथील शिरोडा बीच आणि मोचेमाड बीच अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहेत. वेंगुर्ल्याचा दीपगृह (Lighthouse) आणि तेथून दिसणारा अथांग समुद्र मनाला प्रसन्न करतो.

Best Konkan tourism spots summer | Dainik Gomantak

निवती बीच आणि रॉक गार्डन (सिंधुदुर्ग)

निवती बीच हा कोकणातील एक 'हिडन जेम' आहे. येथील निळे पाणी आणि चहुबाजूंनी असलेला डोंगर यामुळे हे ठिकाण परदेशातील एखाद्या बीचसारखे वाटते. उन्हाळ्यात येथील समुद्राचे पाणी अतिशय स्थिर आणि स्वच्छ असते, जे पोहण्यासाठी उत्तम आहे.

Best Konkan tourism spots summer | Dainik Gomantak

गुहागर (रत्नागिरी)

नारळ-पोफळीच्या बागा आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा हे गुहागरचे वैशिष्ट्य. येथील व्याडेश्वर मंदिर आणि स्वच्छ समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो. उन्हाळ्यात येथील हापूस आंब्याची चव चाखणे ही एक वेगळीच मेजवानी असते.

Best Konkan tourism spots summer | Dainik Gomantak

श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर (रायगड)

पुणे-मुंबईच्या जवळ असलेले हे ठिकाण उन्हाळी सहलीसाठी उत्तम आहे. हरिहरेश्वरला 'दक्षिण काशी' मानले जाते. येथील समुद्रकिनाऱ्यावरील प्रदक्षिणा मार्ग आणि डोंगरावरून दिसणारे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.

Best Konkan tourism spots summer | Dainik Gomantak

उन्हाळ्यात 'ग्लोइंग स्किन' हवीय? मग 'या' चुका टाळा

How to get glowing skin in summer | Dainik Gomantak
येथे क्लिक करा