Manish Jadhav
घरात सुख-समृद्धी आणि संपत्ती आकर्षित करण्यासाठी मनी प्लांट अत्यंत शुभ मानले जाते. हे झाड घराच्या आग्नेय दिशेला लावणे सर्वात उत्तम ठरते.
प्रत्येक हिंदू घरात असणारी तुळस वनस्पती नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि घरात सकारात्मकता व पवित्रता टिकवून ठेवते.
वास्तुशास्त्रानुसार लकी बांबू घरात ठेवल्याने नशीब उजळते आणि कुटुंबात आनंद, शांती व आरोग्य नांदते.
हे झाड घरातील हवा शुद्ध करण्याचे काम तर करतेच, शिवाय घरातील वास्तू दोष दूर करुन ताणतणाव कमी करण्यास मदत करते.
या वनस्पतीला 'ज्याद पॉवर प्लांट' असेही म्हणतात. हे झाड घरात संपत्ती टिकवून ठेवण्यास मदत करते.
घरात प्रेमाचे वातावरण आणि मानसिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी पीस लिलीचे रोप अत्यंत गुणकारी मानले जाते. हे घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते.
आरोग्यासोबतच वास्तुशास्त्रात ॲलोवेरा प्लांटला सौभाग्य आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. हे घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणे फायदेशीर ठरते.