Summer Tips: काळवंडलेल्या त्वचेला म्हणा बाय-बाय! 'या' घरगुती उपायांनी मिळवा झटपट ग्लो; ट्राय करा 'हे' डी-टॅन फेसपॅक्स

Manish Jadhav

उन्हाळ्याचा वाढता तडाखा

उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे त्वचा काळवंडणे (Suntan) ही एक सामान्य समस्या आहे. पण घाबरु नका, घरगुती उपायांनी तुम्ही तुमची नैसर्गिक चमक परत मिळवू शकता!

Summer Tips | Dainik Gomantak

बेसन आणि दह्याचा चमत्कार

2 चमचे बेसनमध्ये 1 चमचा दही मिसळून पेस्ट तयार करा. बेसन मृत त्वचा काढून टाकते, तर दही त्वचेला थंड ठेवून टॅनिंग कमी करण्यास मदत करते.

Summer Tips | Dainik Gomantak

लिंबू आणि मधाचा नैसर्गिक ग्लो

लिंबू नैसर्गिक 'ब्लिचिंग एजंट' आहे. लिंबाच्या रसात थोडे मध मिसळून चेहऱ्यावर लावा. यामुळे काळे डाग कमी होतात आणि त्वचा मऊ होते.

Summer Tips | Dainik Gomantak

कोरफड आणि काकडी

काकडीचा रस आणि कोरफडीचा गर एकत्र करुन चेहऱ्याला लावा. हे मिश्रण सनबर्न शांत करते आणि त्वचेला हायड्रेट ठेवून टॅनिंग झटपट घालवते.

Summer Tips | Dainik Gomantak

बटाट्याचा रस आहे गुणकारी

बटाट्याचा रस नैसर्गिकरित्या त्वचा उजळवतो. बटाट्याचा रस चेहऱ्याच्या काळवंडलेल्या भागावर 15 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

Summer Tips | Dainik Gomantak

टोमॅटो आणि साखरेचा स्क्रब

टोमॅटो कापून त्यावर थोडी साखर टाका आणि चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. टोमॅटोमधील लायकोपीन (Lycopene) सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण करते.

Summer Tips | Dainik Gomantak

संत्र्याच्या सालीची पावडर

संत्र्याच्या वाळलेल्या सालीची पावडर दुधात मिसळून लावा. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेचा काळपटपणा दूर करुन चेहरा फ्रेश ठेवते.

Summer Tips | Dainik Gomantak

लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी!

कोणताही पॅक लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा. तसेच, उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावायला विसरू नका. भरपूर पाणी प्या आणि त्वचा निरोगी ठेवा!

Summer Tips | Dainik Gomantak

Chapora Fort: 'दिल चाहता है' फेम किल्ला संभाजी महाराजांनी कसा जिंकला? छत्रपतींची धडकी भरवणारी गोवा मोहीम

आणखी बघा